Pune Crime News | कौटुंबिक वादातून घरात शिरुन महिला पोलीस अधिकार्‍याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न करणार्‍या पतीला खडकी पोलिसांनी केली अटक

Pune Crime News | कौटुंबिक वादातून घरात शिरुन महिला पोलीस अधिकार्‍याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न करणार्‍या पतीला खडकी पोलिसांनी केली अटक

पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून घरात शिरुन महिला पोलीस अधिकार्‍याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना खडकी बाजार पोलीस वसाहतीत २७ मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

योगेश माधव बेरी Yogesh Madhav Berry (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सहायक पोलीस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करत आहे. त्यांच्या विवाहाला सुमारे १२ वर्षे झाली. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. गेल्या काही महिन्यांपासून पती महिला पोलीस अधिकार्‍याच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलीस अधिकार्‍याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.

पुणे :
 Pune Crime News | कौटुंबिक वादातून घरात शिरुन महिला पोलीस अधिकार्‍याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना खडकी बाजार पोलीस वसाहतीत २७ मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

योगेश माधव बेरी Yogesh Madhav Berry (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सहायक पोलीस निरीक्षक महिला पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत. आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करत आहे. त्यांच्या विवाहाला सुमारे १२ वर्षे झाली. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. गेल्या काही महिन्यांपासून पती महिला पोलीस अधिकार्‍याच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. त्याच्या छळामुळे महिला पोलीस अधिकार्‍याने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता.

ADV

महिला पोलीस अधिकारी खडकी बाजार पोलीस वसाहतीतील अधिकारी  वसाहतीत राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती वेगळा राहत होता. त्याच्याकडे वसाहतीतील घराची चावी होती.  कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केल्याचा राग त्याला होता. त्यातून तो २७ मे रोजी अगोदर खडकी पोलीस वसाहतीतील घरी येऊन लपून बसला होता. एक चावी महिला अधिकार्‍याकडे होती. महिला पोलीस अधिकारी २७ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरी परतल्या. योगेश बेरी याने हातात हॅन्डग्लोज घालून दबा धरुन बसला होता. त्याने अचानक त्यांच्या डोक्यात राख फेकली. “तू बरेच दिवस झाले बचावली आहेस, आज तुला संपवून च टाकतो,” असे म्हणत ओढणीने त्यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करुन स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरडाओरडा ऐकल्यावर इमारतीतील लोक गोळा होऊ लागले. हे पाहून योगेश बेरी पळून गेला. महिला पोलीस अधिकार्‍यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी बेरी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास करीत आहेत.

Related

Related Posts