पुणे : Pune Crime News | पुण्याहून गुवाहाटीला जाणार्या विमानातील प्रसाधनगृहात BOMB असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. त्यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आली नाही. विमानतळ पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इंडिगो विमान कंपनीचे सहायक सुरक्षा प्रमुख विशालकुमार श्रीवास्तव (वय ३०, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे पुणे ते गुवाहाटी हे विमान २९ मे रोजी सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उउ्डाण घेणार होते. विमानात प्रवासी बसलेले असताना त्या विमानात काम करणारी एअरहोस्टेस ईफत खान हिला विमानाच्या लेव्हीटरी मध्ये एका पांढर्या रंगाचे पेपरच्या तुकड्यावर बॉम्ब असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. तिने ही बाबत लीड केबीन क्रु यांच्या ताब्यात दिली. पहाटे ६ वाजून ४४ मिनिटांनी याची माहिती सुरक्षा विभागाला दिली. त्यानंतर कंपनीच्या इंजिनिअर लोकांनी विमान आयसोलेशनला नेले. प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.
विमानाची बी डी डी एस पथक, एअर लाईन इंजिनिअरींग पथक, एअर लाईन्स सिक्युरिटी पथकाने कसुन तपासणी केली. त्यात विमानात कोठेही आक्षेपार्ह वस्तू मिळून आली नाही. विमानामध्ये तसेच लॅव्हीटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ती चिठ्ठी कोणी लिहली हे समजले नाही. कागदाच्या तुकड्यावर बॉम्ब असा धमकीचा संदेश लिहून लोकांची सुरक्षा धोक्यात आणून भितीचे वातावरण निर्माण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड तपास करीत आहेत.