
जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक चर्चांनंतरही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असून, यावेळच्या आंदोलनात त्यांनी सरकारसमोर प्रामुख्याने १० मागण्या ठेवल्या आहेत.
आपल्या या मागण्यांवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ५८ लाख नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र आणि इतर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा हा संघर्ष आणि आंदोलन थांबणार नाही.

मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय?
– मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
– सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा जीआर काढा. 1994 च्या धर्तीवरच जीआर काढा.
– महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
– आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरीचा जीआर काढा.
– सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
– महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
– कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
– मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
– स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
– शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
