Pune ACB Trap Case | शेत जमीन सपाटीकरणाच्या परवानगीसाठी 1 लाखांची लाच मागणार्‍या ग्राम महसूल अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : Pune ACB Trap Case | शेत जमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम व पाईपलाईनची परवानगी मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर प्रथम २ लाखांची मागणी करुन पंचासमक्ष १ लाख रुपयांची लाच मागणार्‍या लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय शिवाजी कोल्हे Akshay Shivaji Kolhe (वय २८, रा़ टुड्रास हाईटस, कोद्रेनगर, शेवाळवाडी) असे या ग्राम महसूल अधिकार्‍याचे नाव आहे.

तक्रारदार याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतजमीन घेतली आहे. या शेतजमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम व पाईपलाईनची परवानगी मिळावी, याकरीता त्यांनी लोणी काळभोर येथील अपर तहसीलदार यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. तेथे अक्षय कोल्हे हे ग्राम महसूल अधिकारी म्हणून काम करत आहेत. तक्रारदाराने मागितलेल्या परवानगी बाबत त्याने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्याची तक्रार १ एप्रिल २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने २ एप्रिल २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात कोल्हे याने तक्रारदाराकडे त्याने मागितलेल्या परवानगी अर्जावर अपर तहसीलदार यांच्याकडून कार्यवाही करुन देतो, या कारणासाठी तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. परंतु, काही कारणामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी  केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top