Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे नवे भाव

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे नवे भाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या दरांमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज शनिवार, ३० मे २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दिसून आला. सोन्याचे दर काहीसे खाली आले असले, तरी चांदीच्या दरांमध्येही बदल नोंदवले गेले आहेत.

गेल्या वर्षापासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकाला सोने खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल. तथापि, आज चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अत्यंत शुभ आहे; कारण आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. आज १० ग्रॅमचा भाव १ लाख ५६ हजार ५३० आहे, तर तर चांदीचे दर २ लाख ६७ हजार ३०० रुपये प्रतिकिलो आहे.

  • सोने १० ग्रॅमचा भाव ः एक लाख ५६ हजार ५३० रुपये
  • चांदी १ किलो भाव ः दोन लाख ६७ हजार ३०० रुपये

Related

Related Posts